किल्ला क्र. ६ प्रतापगड (Pratapgad)

प्रतापगड

महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे प्रतापगड... शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देणारा हा किल्ला फारच रमणीय आहे. नीरा आणि कोयनेच्या परिसरात मराठ्यांनी जी सत्ता मिळविली होती तिच्या रक्षणासाठी एक मजबूत किल्ला बांधणे गरजेचे होते. म्हणून १६५७ साली प्रतापगडाची निर्मिती झाली. 
प्रतापगडाच्या इतिहासात डोकावता , १६५६ मध्ये चंद्रराव मोर्यांचा पराभव करून शिवाजी महाराजांनी 'जावळी' ताब्यात घेतली. त्यावेळी जावळीच्या खोऱ्यात पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर "भोरप्या डोंगर " एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधण्याची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दुर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलुंद व अभ्येद्य किल्स तयार केला. प्रतापगड.... 
१६५९ साली शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे विजापूरचे आदिलशाह चिंतीत झाले. त्यांच्या चिंतेचे निवारण करण्यासाठी अफजल खानाने शिवाजी महाराजनाच्या हत्येचा कीड उचलला. अफजलखान स्वारी करायला येत आहे हे समजताच राजे प्रतापगडावर आले. अफजलखान प्रतापगडाला वेढा घालून बसला. डावपेच खेळू लागला. महाराजांनी त्याला आपण घाबरले असल्याचे भासवून भेळीचा दिवस ठरविला. शामियाना उभारला. अफजलखानाने मिठी मारण्याच्या बहाण्याने शिवाजीराजांना मारण्याचा प्रयत्न केला परंतु राजांच्या चिलखतामुळे ते बचावले. शिवाजी राजांनी वेळ न दवडता अफजलखानाच्या पोटात वाघनखं खुपसून त्याचे पोट फाडून त्याचा वाढ केला. 

सय्यद बंडा महाराजांवर धावून आला परंतु जिवाजी महालांच्या सावधानतेने राजे बचावले. तेव्हापासूनच "होता जीव म्हणून वाचला शिव " अशी म्हण प्रचलित आहे. त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उसवून दिला. स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाने आणि हुशारीने प्रतापगड प्रसिद्ध झाला. 
सातारा जिल्ह्यातील जावळी या तालुक्यात महाबळेश्वर पासून सुमारे ८किमी अंतरावर एक डोंगर आहे. त्या डोंगरावरील डोपऱ्या नावाच्या टेकडीवर हा किल्ला दिमाखात उभा आहे. दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखाली वाहनतळ आहे. तेथून गडाच्या पश्चिममुखी दरवाजातून उजव्या तटबंदीवर जात येते. या दरवाज्याची रचना अशी करण्यात अली आहे की त्यावर तोफांचा थेट मारा करता येऊ नये किंवा हत्ती व ओंडक्याच्या साहाय्याने देखील तोडता येऊ नये. 
 एक वैशिष्टय म्हणुजे हा दरवाजा शिवकालीन प्रथेनुसार सूर्योदयापूर्वी उघडतात व सूर्यास्तानंतर बंद करतात. तटबंदीवर जागोजागी जंग्या म्हणजे शत्रूंवर धनुष्यबाणाने हल्ला करण्यासाठी ठेवलेली छिद्र आहेत. हि रचना अशी करण्यात अली आहे कि गडावरील सैनिक सुरक्षित राहतील परंतु शत्रू मात्र बाणांच्या माऱ्यात असतील. प्रतापगडाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला एक गुहा आहे. मुख्य दरवाजा उजव्या बाजूला चिलखती बांधणीला बुरुज आहे. 

वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत ;लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो. हा बुरुज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जात येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबिरराव मोहिते यांची तलवार आहे. 

 ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थ स्थापित हनुमानाची मूर्ती दिसते. पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सादर आहे. किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पहिले असता मोठेमोठे पर्वत दिसतात आणि या प्रत्येक पर्वतांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. 
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाद होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरुन फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहाऱ्याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरुज, पुढे यशवंत बुरुज, त्याच्या पुढे सूर्य बुरुज आहेत. 
 भवानी मंदिरापडून पुढे चालत गेल्यास एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्या पुढे एक पडीक चौथरा आहे. किल्लाची १४०० फूट लांबी आणि ४०० फूट एवढा विस्तार आहे. इतर गदपेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहुन अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्ल्यातल्या दोन टाळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते आणि येथेच हि किल्ल्याची फेरी पूर्ण होते. 
 प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण महाबळेश्वर. उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाच्या डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या फोन गावांमधल्या डोपऱ्या नावाच्या एक टेम्भेवर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ अली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जात येते.
अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरु होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दुर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पती दिसते. दुर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकाच महेश्वर आहे. त्याच्या खालच्या दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात. 




धन्यवाद.... 

Comments