किल्ला क्र . ८ अजिंक्यतारा ( Ajinkyatara )

 अजिंक्यतारा

अजिंक्यतारा हा किल्ला सातारा जिल्ह्यातील सातारा गावातीलच आहे. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. त्याची उंची साधारणतः ३०० मी असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटर आहे. या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक उपक्रम राबवले जातात. 
अजिंक्यतारा म्हणजेच सातारचा किल्ला म्हणजेच मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड, दुसरी रायगड, तिसरी जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. साताऱ्याच्या किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधाला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मशे पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगेजब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने साताऱ्याचा किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरुज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले तेवढ्यात दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणार्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मुघल साइन मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारुगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घातला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकवयास तब्बल साडेचार महिने लागले. नंतर किल्ल्याचे नामकरण आझमतारा झाले.
ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामांतर पुन्हा अजिंक्यतारा केले. पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. मराठी साम्राज्याचा कारभार हाकताना छत्रपती शाहूंनी सातारा शहराची स्थापना केली. दुसऱ्या शाहूंच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इंग्रजांकडे गेला. 
साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्ही बुरुज आज सतित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. मात्र गडावर पाण्याची सोया नाही. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसारभारती केंद्राचे दोन टॉवर आहेत.
पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व मंगलादेवी मंदिराकडे जाते. या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहेत. वाटेच्या शेवटी मंगलादेवीचे मंदिर लागते. मंदिरच्या समोरच मंगळाई बुरुज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्पे आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साहाय्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदिक्षणा घाल्यासारखे आहे. गडाच्या उत्तरेलादेखील दोन दरवाजे आहेत. ते तटबंदीवरुन प्रदक्षिणा मारताना नजरेस पडतात.

या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात एकही तलावात पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो. तसेच दक्षिण दिशेला निनाम (पाडळी )हे गाव दिसते. या गावात एक पुरातन ( इ.स. १७००) मधील कोल्हापूरच्या ( रतनागिरीवाडी ) जोतिबाचे देऊळ आहे.
तसेच गावालगत डोंगर आहे. तेथे पांडवगळ नावाचे एक पारूनकाळीं प्रेक्षणीय स्थळ आहे व या गावाच्या पश्चिम दिशेला तलाव आहे. संपूर्ण गाद बघण्यासाठी साधारणतः दीड तास लागतो. गडावरून मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहराचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. जर आपण निसर्गप्रेमी असाल तर वर्षा ऋतूच्या सुरुवातीनंतर आपण या ठिकाणी येऊन अजिंक्यतारा किल्ल्याची सुंदरता बंधू शकतो.
अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने अनेक वाटांनी गडावर जात येते. सातारा एस टी स्थानकावरून अदालत वाडा मार्गे जाणाऱ्या कोणत्याही गाडीने अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जात येते. सातारा ते राजवाडा अशी बससेवा दार १०-१५ मिनिटाला आहे. राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत चालत येण्यास १० मि. लागतात.

अदालत वयाच्या बाजूने असलेली वाट गडावर जाणाऱ्या गाडी रस्त्याला लागते व त्या रस्त्याने १ कि.मी चालत गेल्यावर माणूस गडाच्या दरवाज्यापाशी पोहोचतो. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्तासुद्धा आहे. गोडली नका पॅसीसरातून देखील गडावर जाण्यासाठी रस्ता आहे. आपण या रस्त्याने थेट गडावर जाऊ शकतो. कोणत्याही मार्गाने गाद गाठण्यास साधारण १ तास लागतो. गडावर पहाटे चाथून जाणे प्रकृतीच्या दृष्टीने चांगले आहे.


धन्यवाद..... 

Comments