पोलीस उपनिरीक्षक बनला अभिनेता, बघा कोण आहे तो...

आता पर्यंत अभिनेत्याला खाकी वर्दी घातलेली आपण पाहिली. अजय देवगण, सलमान खान , आमिर खान, अक्षय कुमार, अश्या अनेक सुपरस्टार्सने खाकी वर्दी चढवून चित्रपटात भूमिका केल्या. खाकी वर्दीचे आकर्षण फक्त सिने कलाकारणाचं आहे असे नाही, 
तर आपल्या सर्वाना खाकी वर्दीचे आकर्षण आहे. पण सांगलीचा पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील याने लहानपणापासून जोपासला अभिनेता होण्याच्या स्वप्नामुळे पोलीस दलातील नोकरी सोडून दिली. ३० मार्च रोजी आलेल्या " गावठी" या मराठी चित्रपटाद्वारे मुख्य नायकाच्या भूमिकेतून श्रीकांत पाटील याने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. 

बरेच वेळी गावातून शहरात गेलेल्या मुलाना आपली प्रगती झाली की  आपले गाव, आपली माणसं यांचा विसर पडतो, पण या चित्रपटात आपल्या पालकांनी आपल्यासाठी केलेले कष्ट, आपल्या गावचे, शाळेचे आपल्यावर असलेले उपकार याची जाणीव असलेल्या एका मुलाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. 

गजानन ( श्रीकांत पाटील ) लहानपानपासून खूप हुशार असतो. मोठा होऊन खूप प्रगती कर आणि गावाच्या विकासासाठी हातभार लाव असे त्याचे वडील ( किशोर कदम) यांनी सांगितलेले असते.   

गजाननाचे प्रेम गौरीवर ( योगिता चव्हाण ) असते. ती गावातल्या सावकाराची मुलगी असते. पण गौरीच्या वडिलांना याचा विरोध असतो.  

त्यांचा प्रेम प्रकरणात पुढे काय होत, गौरी गजाननाला मिळते कि नाही हे जाणून घ्यायचे तर नक्कीच गावठी चित्रपट पहा. 
गजानन ( श्रीकांत पाटील ) सारखे अनेक कष्टकरू मुले आज आपल्याला दिसतील. अतिशय गरीब परिस्थितुलन मोठे झालेले लोक या जगात पाहावयस मिळतील. नक्कीच या चित्रपटातुन आपल्याला प्रेरणा मिळेल. एक सामाजिक संदेश आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळेल. 

कलाकार- श्रीकांत पाटील, योगिता चव्हाण, नागेश भोसले. 
निर्माता- सीवा आर. कुमार. 
दिग्दर्शक- आनंद कुमार कोन्नार 

Comments