किल्ला क्र . ३ रोहीडा

 रोहीडा 

रोहीडा म्हणजेच विचित्रगड  पुणे जिल्ह्यातील भोर पासून १० किमी आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील महत्वाचा किल्ला आहे. हा किल्ला ३३६०मी उंचीचा गिरिदुर्ग आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. रोहीडा किल्ला हा नीरा नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती, यापैकी ४१ गावे अध्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहीडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे म्हणतात. 
हा किल्ला यादव कालीन आहे. या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. या शिलालेखावरून मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलचे मुख्य कारभारी होते. लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकार्यांना स्वराज्यात सामील केले गेले. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जुन १६७० रोजी शिवरायानी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम म्हणून होते. रोहीड्याचे गडकरी त्यांच्याकडून ३० होन घेत होते. शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांकडे विचारांनी केली का? शिवाजी महाराजांनी निर्णय दिला कि, जेथे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. 
 पुढे किल्ला मोघलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हाही किल्ला भोरकरांकडे होता. 
पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायऱ्या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते. येथून ५-७ पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहेत. 
येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. एक गडावरील सादर, तर दुसरे किल्लेदाराचे घर. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यास रोहिडमल्ल उर्फ भैरोबा चे मंदिर आहे. मंदिरासमोर लहान टाके दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहीड्याचा घेर तास लहान आहे. किल्ल्याच्या आग्नेयास शिरवले बुरुज, पश्चिमेस पाटणे  बुरुज व दामगुडे बुरुज, उत्तरेस वाघजाईचे बुरुन व पूर्वेस फत्ते फुरुज व सदरेच्या बुरुज असे एकूण ६  बुरुज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहे. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग  आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. तेथेच मानवी मूर्ती व शिवपिंडी आहे. संपूर्ण गाद फिरण्यास दीड तास पुरतो. 

 दक्षिणेस ८-१० किमी अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एस टी  सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीपासून वळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून दरवाजापर्यंत पोहचण्यास एक तास लागतो. आंबवडे मार्गे भोर ते आंबवडे अशी एसटी सेवा उपलब्ध आहे. पुणे-भोर-पाणवळ -आंबवडे अशी अशी बस सेवा उपलब्ध आहे. आंबवडे गावी उतरून गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गाद चढण्यास सुरुवात होते. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गाद गाठण्यास सुमारे अडीच तास लागतो. शक्यतो गडावर जाताना बाजारवाडी मार्गे जावे आणि उतरताना नाझरे किंवा आंबवडे मार्गे उतरावे. म्हणजे रायरेश्वरकडे जाण्यास सोपे जाते. 
भोर-कारी बसने करी गावात उतरावे तिथून लोहदरा मार्गे २ तासांत रायरेश्वर पठाराकडे पोहचतो व पठारावरील वस्ती पर्यंत जाण्यास दीड तास लागतो.

वडतुंबी मार्गे जाताना वडतुंबी फाट्यावर उतरावे लागते. तिथून १५ मिनिटांत वडतुंबी गाठावे. येथून साधारणतः २ तासात गणेशदरा मार्गे रायरेश्वर पठारावर पोहचता येते.
भोर-कोर्ले गाडीने कोर्ले गावात उतरून गायदरा मार्गे ३ तासात रायरेश्वर पठारावरील देवळात जात येते.

भोर-दाबेकेघर बसने दाबेकेघरला उतरायचं व तिथून धनावली पर्यंत चालत जायचं. पुढे वाघदरामार्गे ३ तासात रायरेश्वर गाठायचं.

" स्वराज्य शपथेचा साक्षीदार- रायरेश्वर "


शिवाजी महाराजानी वयाच्या १६ वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला  याच रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली. स्वतःच्या रक्ताने रायरेश्वरचा अभिषेक केला.
धन्यवाद......

Comments