किल्ला क्र. २ तोरणा

तोरणा 

तोरणा हा डोंगरी किल्ला आहे. तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वांत उंच डोंगर. दुर्ग कोटात अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गाद प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत. या वेल्ह्याच्याच डोक्यावर एका उंच जागी बसला आहे. शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणा ऊर्फ प्रचंडगड!



 एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदी खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड. पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरणा पर्यंतचे अंतर ६० किमी आहे. या गडावर पूर्वी तोरण जातीची झाडे जास्त होती म्हणून याला तोरणा असे नाव मिळाले असे म्हटले जाते. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून "प्रचंडगड" असे ठेवले. तोरण्याची उंची ४६०६फूट आणि सारी वाट उभ्या धारेवरची. शिवरायांनी १६४७ मध्ये तोरणा किल्ला जिंकला व हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारले. खरेतर शिवरायांनी तोरणा  घेण्यापूर्वीच रोहिडा, कोंढाणा जिंकत स्वराज्याची घोडदौड सुरू केलेली होती.

हा किल्ला कधी व कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरून हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ. स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांचा ताब्यात आणला. 


 पुढे इ.स. १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्याला ताब्यात आणला व याचे नाव
 फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गाद पुन्हा मराठांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांच्या ताब्यात दिले त्यामध्ये तोरणा महाराजांच्याकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगाजेबाने लढाई करून जिंकलेला असे हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. तोरणा गडावर मेंगाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर खूप जुने आहे. 


बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठ कोठी दरवाजातून आपण बालेकिल्ल्यात शिरतो. किल्ल्यावर जाताना थेट बालेकिल्ल्यातील प्रवेश हेही तोरण्याचे वैशिष्ट्य आहे. आत शिरताच समोर दिन टाक्या दिसतात. तोरण आणि खोकड अशी त्यांची नवे. इथेच तटावर तोरणजाईच्या घुमटी आहेत. 




  "सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणयास गरुडाचे घरटे म्हणावे लागेल"


पुण्याहून नसरापूर मार्गे वेल्हे ६८ किलोमीटर स्वारगेटहून वेल्हा साठी थेट एस टी  बससेवा आहे. स्वतःचे वाहन असेल तर पुण्याहून पानशेत रस्त्यावरून पाबे घाटमार्गेही वेल्हाला जवळच्या रस्त्याने जात येते. वेल्हे हे आजचे तालुक्याचे ठिकाण, पण पूर्वी भोर संस्थांनाच्या काळात प्रचंडगड हा तालुका होता आणि वेल्हे हि त्याची बाजारपेठ होती.

धन्यवाद 

Comments