रतनगड
रतनगड सह्याद्रीतल्या दुर्गरत्नांमधे असणारं एक अमोलिक रत्न म्हणून रतनगड परिचित आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा जवळ असलेल्या रतनवाडी जवळ आहे. या गडावर वर्षभर ट्रेकर मंडळींचा राबता असतो.
१७६३ हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेट मध्ये नोंद आहे. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी हि सह्याद्रीच्या वरची व खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशी परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गार्डनने गाद ताब्यात घेतला. १८२४ साली किल्लेदार गोविंदराव खाडे ह्याला हरवून आदिवासी सेनानी रामोजी भागरेनी गड ताब्यात घेतला.
पुराणात असा उल्लेख आहे समुद्र मंथन झाल्यावर देव आणि दानव यसमुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन केले त्याच पंक्तीमध्ये राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहेस असे समजताच विष्णूने मोहिनी रूप धारण करून त्या दानवाचा शिरच्छेद केला. त्याचे धड राहुरी या ठिकाणी पडले, तर शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरून वाहू लागली त्या काळापासून त्या धारेने नरूपांतर झाले व नदीस अमृत वाहिनी असे नाव पडले.
गडाच्या जवळ नैसर्गिक रित्या एका शिखराला पोकळी तयार झालेली तिला नेढे आहे म्हणतात. गडावरून प्रवरा म्हणजेच अमृतवाहिनी नदीचा उगम होतो. याच नदीवर भंडारदरा धरण बांधलेले आहे. या गडावरून अलंग, कुलंग, हरिश्चंद्र गड दिसतात.
किल्ल्याला चार दरवाजे आहेत. गणेश दरवाजा, कोंकण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि त्रिंबक ददरवाजावर गणपती आणि हनुमानाची शिल्पे दिसतात. गडावर बऱ्याच विहिरी आहेत. रतनवाडीत मुख्य आकर्षण म्हणजे अमृतेश्वर मंदिर, हे मंदिर हेमाडपंती असून ८ व्या शतकातील आहे, तसेच कोरीव नक्षींसाठी प्रसिद्ध आहे.
गडावरील प्रेक्षणीय ठिकाणे-
१. गणेश दरवाजा
२. रत्ना देवीची गुहा
३. मुक्काम गुहा
४. महादरवाजा ( त्रिंबक दरवाजा )
५. इमारतींचे जोते ( गडावर वास्तव्याला असलेल्या जुन्या इमारतींचे अवशेष )
बालेकिल्ल्यात जाण्यासाठी या पायऱ्यांचा वापर करावा लागतो.
त्रिंबक दरवाजापासून खाली गेल्यास हा रस्ता लागतो.
गडावर बरेच पाण्याचे टाक आहेत, तसेच झरे देखील आहेत. त्यातील काही पिण्यायोग्य आहेत. कल्याण दरवाजा जवळील जारा सुमधुर आहे.
गडावर जाण्यासाठी तीन वाट आहेत. पहिली रतनवाडीहून, दुसरी कुमशेतहून ( हि वाट शिवकालीन आहे ), आणि तिसरी साम्रादहुन
मुंबईहून इगतपुरी-घोटी मार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनवाडीला पोहोचता येते.
धन्यवाद.....
Comments
Post a Comment