रायगड
१) मेना दरवाजा: पालखी दरवाज्याने प्रवेश केल्यास चढउतार असलेला एक सरल ,मार्ग आपल्याला मेना दरवाज्यापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष आहेत रानी महालचे। मेना दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
२) राजभवन: राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या महालचे अवशेष आहेत. या अवशेषांच्या मागे दुसरी जी भिंत आहे तय भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे, तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केल्यास जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभावांचा चौथरा ८६ फुट लांब व ३३ फुट रुंद आहे. राजप्रासादजवळील स्तंभाच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे. तीच ही "रतनशाळा" हा खलबतखाना असावा असेही म्हणतात.
३) राजसभा: महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला तिलाच राजसभा म्हणतात. राजसभा २२० फुट लांब व १२४ फुट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहसनाची जागा आहे. येथेच बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, " तख़्त सुवर्णाचे बत्तीस मणाचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केलि."
४) नगारखाना : सिंहसनच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार आहे तोच नगारखाना आहे. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्याकडून पायऱ्या चढून वर गेले की माणुस किल्ल्यावरील सर्वात ऊंच ठिकाणी जातो.
५) बाजारपेठ : नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा आहे तो ' होळीचा माळ ' आहे. तेथेच आता शिवजी महाराजांचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्या समोर जे दोन बाजूने अवषेश आहेत, तीच शिवकालीन बाजारपेठ आहे. दोन्ही बाजूंनी प्रतेकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून ४० फुट रुंदीचा रास्ता आहे. ते बाजारपेठ आजही जैसेच्या तसे आहे.
६) शिरकाई देऊळ : महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस छोटे देऊळ आहे ते शिरकाई देवीचे मंदिर आहे. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता आहे. शिर्के पाचव्या शतकपासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वामिनी. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनियर ने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर रजवाड्यास लागूं डावीकडे होळी मालावार होते. तेथे मूळ देऊळाचा चबूतरा आहे.
७) जगदीश्वर मंदिर : बजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारवर ब्राह्मणवास्ती, ब्राह्मणतले यांचे अवषेश दिसतात. तेथूनच जे भव्य मंदिर दिसते तेच जगदीश्वरचे मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ति आहे. मंदिरात प्रवेश केल्यास भव्य सभामंडप लगता. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ति दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वारच्या पायऱ्यांच्या खाली एक लहान शिलालेख आहे. तो ' सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटलकर' या दरवाज्याच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो ' श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्वरस्य जगतमानंदादोनुज्ञया श्रीमच्छत्रप्तेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तिमाहिते शुक्लेशसापै तिथै।। १।। वापिकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वितीकौ स्तभेः कुंभिगृहे नरेंद्रसदनैरभंलिहे मीहिते। श्रीमद्रायगिरै गिरामविषये हिराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावास्तमुज्जृम्भते।।२।।याचा थोडक्यात अर्थ असा की, सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञने शेक १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकारने विहिरी, तळ, बागा, रस्ते, स्तंभ , गजशाळा , राजगृहे आशांची उभारणी केली, ती चंद्र सूर्य असतोवर खुशाल नांदो.
८) महाराजांची समाधी : मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोडया अंतरावर अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी आहे. सभासद बखर म्हणतात, ' क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शेक १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्यानी बांधलेल्या जगदीश्वराचा जो प्रासाद आहे तेथे आहे. तेथे काळ्या दगडाच्या चिर्याचे सुमारे छातिभर उंचीचे अष्टकोणी जोते बांधिले असून वरुन फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे. तिथे महाराजांचा अवशिष्टांश रक्षामित्र मृत्तिकारूपाने सापडतो.' ,दहनभूमी पलीकडे भगन इमरतींच्या अवषेषांची एक रांग आहे. ते शिबंदी निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलन असा एक घराचा चौथरा आहे. हे घर इ. स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्सेनडन यास राहावयास देले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक, तर उजवीकडे तोफेच्या दारुचे कोठारे, बारा टाकी आहेत.
९) कुशावर्त तलाव : होळीच्या माळाच्य उजवीकडे कुशावर्त तलवाकडे जाते. तलवाजवळ महादेवाचे देऊळ आहे.
१०) वाघ दरवाजा : कुशावर्त तलवाजवळ घलीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, " किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, याकरिता गड पाहून एक दोन तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्यात. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिनून टाकाव्या.'" अशा दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच आहे, दोर लावून खाली उतरु शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी ज़ुल्फ़िरख़ानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटले होते.
११) टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरील टेपवारुन खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एक तोफेच्या दारुचे कोठाराचे अवशेष आहेत. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुलता होत जातो. उजव्या हाताला सरळ २६०० फुट खोल कड़ा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागा ही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बालगावी लागते. पेशवे राज्यकाळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.
१२) वाघ्या कुत्र्याची समाधी : इतिहासात असे म्हंटले जाते की शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली. त्याची देखील समाधी आपल्याला गडावर पहावयास मिळते
जाण्याचा मार्ग :
पुण्याहून रायगडपर्यंत जाण्यास थेट बस सेवा आहे. ही बस पुण्याहून भोरमार्गे वरंधा घाटातून महादमार्गे पाचाड गावातून रायगडच्या दोरवाटेच्या तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून पायी अवघ्या १४३५ पायऱ्या चढून गेले की रायगडमाथा गाठता येतो. याच खिंडीत रायगडाच्या विरुद्ध दिशेस चढून गेल्यास एक गुहा लागते. तिला वाघबील किंवा नचानतेपाची गुहा किंवा गन्स ऑफ पाचाड असे म्हणतात.
गडावरील राहायची सोय : गडावर राहायची उत्तम सोय आहे. गडावर एक धर्मशाळा आहे. एक मोठे हॉल व छोट्या मोठ्या आशा ७-८ खोल्या आहेत. राहण्याची सोय विनशुल्क आहे.
धन्यवाद
- मनोज बोबडे
Comments
Post a Comment