रायगड
१) पाचाडचा जिजाबाईंचा वाडा - उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वर मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाद बांधून दिला. तोच हा माँसाहेनाबांचा राहता वाडा . वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती.
पायऱ्यांची एक उत्तम विहीर तसेच जिजाबाईंना दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास 'टक्क्याची विहीर' असेही म्हणतात. तिथेच जिजाबाईंची आहे.
२) खुबलढा बुरुज - गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरुज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता. त्यास ' चित दरवाजा ' म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
३) नाना दरवाजा - या दरवाजास ' नाणे दरवाजा ' असेही म्हणतात. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्याने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेण्डन याच दरवाजाने आला होता.
या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यास ' देवडा ' म्हणतात. दरवाजास घालण्यासाठी दिसतात.
४) मदार मोर्चा किंवा मशीद मोर्चा - चित दरवाज्यने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदुनशाह नावाच्या साधूचे थडगे आहे. तिथेएक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
५) महादरवाजा - महारावजाच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणाऱ्या या दोन कमळाचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ' श्री आणि सरस्वती ' नांदत आहे. ' श्री आणि सरस्वती' म्हणजे 'विद्या व लक्ष्मी' होय.
महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून एक ७५ फूट, तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमधे जी उतरती भोके ठेवलेली अस्तरात त्यास ' जंग्या ' म्हणतात. शत्रूवर मारा मारण्यासाठी हि भोके असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत या;यावर पहारेकर्यांच्या देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोलून दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.
६) चोरदिंडी : महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते. त्यावरून चालत गेल्यास जिथे ही ततबानी संपते , त्याच्या थोड़े अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत पायऱ्या आहेत.
७) हत्ती तलाव : महादरवाज्यातून थोड़े पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलवाचा उपयोग होत होता.
८ ) गंगासागर तलाव : हत्ती तलवापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५०-६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्यभिषेकानंतर सप्तसागर व महांनानी आणलेली तीर्थेयाच तलावत टाकली गेली. म्हणूनच याचे गंगासागर असे नव पडले. शिवाजी महाराजांच्या काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
९) स्तंभ : गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यास स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामधे ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे. ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते ऐसे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामत नक्षीकाम आढळते.
१०) पालखी दरवाजा : स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.
धन्यवाद

Comments
Post a Comment